भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी घेतले ताब्यात

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे गेली दिड वर्षापासून बंद ठेवण्यात आली आहेत करोनाची लाटही ओसरत जात असल्याचे चित्र असून अनेक निर्बंध हटविले आहेत. मात्र मंदिरे अजूनही चालू करण्यात आली नाहित त्यासाठी भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

भाजपचे आंदोलन सुरु असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वात बाबुलनाथ मंदिरात येथे भाजपकडून आंदोलन चालू होते. त्यावेळी मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुनगंटीवार बाबुलनाथ मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडविले व ताब्यात घेतले. यासह पंढरपूर, पुणे ईत्यादी शहरात भाजपने जोरदार आंदोनल सुरु केले आहे. त्यामुळे पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणखीच आक्रमक होताना दिसून येत आहेत.