वणी (यवतमाळ) : येथील गँगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात असलेल्या बिल्डर च्या ऑफिस मध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टावर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धाड टाकून बिल्डर सह चौघांना ताब्यात घेतले असून पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ वणीत दाखल झाले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ हे यवतमाळ येथे रुजू होताच त्यांनी अवैध व्यवसाया विरोधात मोर्चा खोलला जिल्ह्यातील सर्व ठाणेदार यांना आपल्या परिसरात असलेले अवैध धंदे बंद करा असे फर्मान सोडले होते तरी देखील छुप्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरू असल्याचे या कारवाही मूळे उघड झाले आहे येथील वरोरा मार्गावर असलेल्या गँगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात जम्मू खान या बिल्डर चे ऑफिस आहे याचं ऑफिस मधून क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळाली त्यांनी आपल्या पथकासह दुपारी 5 वाजताचे सुमारास आमेर बिल्डर च्या ऑफिस वर धाड टाकली असता क्रिकेट सामन्यावर जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आल्याने बिल्डर जम्मू खान यांना ताब्यात घेऊन मोमीनपुरा येथिल बिल्डर चे घर गाठले व पोलिसांनी जम्मू खान यांच्या घराची झडती घेतली आहे वृत्त लिहे पर्यंत कारवाही सुरू होती.