अल्ट्राटेक कंपनीत नोकरीकरीता आदिवासी युवकाची आर्थिक फसवणूक

0
23

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूरच्या पॉवर युनिटमध्ये बॉयलर अटेंडंट या जागेवर परमनंट नोकरी लावून देतो म्हणून आदिवासी युवक मोरेश्वर कोडापेला मनसे नेता चंद्रप्रकाश बोरकर यांनी सत्तर हजार रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला असून अनेकांची फसगत केली जाण्याची शक्यता आहे अशा फसवेगिरी करणार्‍या नेत्यांकडून युवकांनी सावधानी बाळगण्याची गरज आहे.

सविस्तर वृत्त असे की नांदा येथील मोरेश्वर कोडापे हा युवक आयटीआयचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर सन २००८-०९ अल्ट्राटेक कंपनीचे पावर प्लांट प्रशिक्षार्थी म्हणून कामावर होता यानंतर त्याने काही दिवस ठेकेदारीत काम केले आहे याच दरम्यान त्याची चंद्रप्रकाश बोरकर याचेशी जवळीक झाली चंद्रप्रकाश बोरकर मनसेचा नेता असून नांदा ग्रामपंचायतीत मनसेची सत्ता होती चंद्रप्रकाश बोरकर हा अल्ट्राटेक कंपनीत पावर प्लांटला स्टोअर किपरला नोकरीवर होता अल्ट्राटेक कंपनीत पावर प्लांट मध्ये बाॅयलर अटेंडंटच्या जागा भरणार असल्याचे सांगुन तुला या जागेवर परमनंट नोकरी लावून देतो असे सांगून चंद्रप्रकाश बोरकर याने मोरेश्वर कोडापे या आदिवासी युवकाकडून अनुपम बॅनर्जी व बिरेवार साहेबाला पैसे द्यावे लागते असे भासवून ७२ हजार रुपये दिले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे जुलै २०१३ मध्ये पैसे घेतल्यावर वर्षभर जागा निघणार आहे असे सांगुन तुला नोकरीवर लावून देतो असे आश्वासन मनसे नेत्याकडून मिळत होते दोन वर्ष लोटूनही नोकरी लावून देत नसल्याने पैसे परत करण्याची विनवणी मोरेश्वर व त्याचे आईवडील करीत होते परंतु बोरकर पैसे परत करण्याऐवजी बहाणेबाजी करून तुला इथे नाही तर माणिकगढ मध्ये लावून देतो असे सांगत होता परमनंट नोकरीही नाही व पैसेही परत मिळत नसल्याने मोरेश्वरने वर्धा पावर प्लांट वरोरा येथे ठेकेदारीत कामावर जाणे योग्य समजले त्यानंतर २०१४ मध्ये मुरली सिमेंट कंपनीत काम केले २०१६ मध्ये मुरली सिमेंट कंपनी बंद झाल्याने मोरेश्वरने रोजगारासाठी नासिकच्या युटेक शुगर कंपनीत काम केले कोरोना काळात हातचे काम सोडून मोरेश्वर स्वगृही परतला ७ महीने हाताला काम नसल्याने मोरेश्वर ने पैसे परत करण्याचा तगादा चंद्रप्रकाश बोरकर कडे लावला परंतु आज येतो उद्या भेटतो घरी येतो असे सांगून बोरकर बहाणेबाजी करीत असल्याने अखेर मोरेश्वरने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलिस स्टेशन गडचांदूर व उपविभागीय पोलिस अधिकारी गडचांदूर यांच्याकडे कडून चौकशी करुन पैसे परत मिळवून देण्यासह कारवाई करण्याची मागणी केल्याने खळखळ उडाली आहेत अशा फसवेगिरी करणार्‍या नेत्यांकडून युवकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
ReddIt
Email
Linkedin
Previous articleसरपंच आरक्षण | 743 में से 373 ग्रामपंचायतों पर महिला राज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here