घुग्घूस : आज दुपारी 2:30 वाजता दरम्यान भाटिया कोल वाशरी जवळ झालेल्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांचा राजीव रतन रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर त्याचा भाऊ हा गंभीर जखमी आहे.
उमेश नारायण दानव (35) मुलगा आयुष उमेश दानव (8) व सतीश दादाजी दानव रा. वाघेडा, भद्रावती हे दुचाकी क्र. एमएच 34 बीई 8196 ने घुग्घूस मार्गे घरी परत जात असताना तडाळी वरून घुग्घूस कडे येणारी कार क्र. एमएच 34 एएम 8508 ने जोरदार धडक दिली. यात आयुषचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी उमेश दानवला गंभीर जखमी अवस्थेत राजीव रतन दवाखान्यात उपचारा साठी भर्ती केले असता त्याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ सतीश दानव हा गंभीर आहे.