चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यांत आज पार पडलेल्या एकूण ४३ ग्राम पंचायती पैकी १५ ग्राम पंचायत मधे सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुक प्रक्रियेत काँग्रेस ने मुसंडी मारत १५ पैकी १० ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला असून भाजपच्या वाट्याला मात्र ३ रा काँच्या वाटेला एक असे पक्षीय बलाबल मिळाल्याने तालुक्यात काँग्रेस तर्फे जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
गोंडीपरीत तालुक्यांत एकूण 50 ग्रामपंचायती असून यापैकी 43 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यात प्रत्येक राजकीय पक्षात तर्फे सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीपूर्वीच दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. शासनाच्या सरपंच उपसरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक तीन टप्प्यात येण्याचे निवडणूक विभागातर्फे परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आज दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडलेल्या एकूण 43 पैकी 15 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत 15 पैकी 10 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला असल्याचे माहिती तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी तुकाराम झाडे यांनी दिली आहे. यात काँग्रेसच्या कोट्यात चेक लिखितवाडा, धामणगाव, गणेशपिंपरी, सकमूर , चेक बेरडी, करंजी, चेक घडोली, डोंगरगाव , पोडसा ,दरुर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीदरम्यान तालुक्यातील मौजा ताडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत कोरम अभावी निवडणूक प्रक्रिया तहकूब करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव असलेल्या करंजी ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळविला असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी गड राखल्याने काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले जात असून उर्वरित 28 ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया उद्या दिनांक 9 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी असे क्रमवार करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून पत्रान्वये दिल्या गेली आहे