चंद्रपूर : 24 मृत्यू तर 1265 कोरोनामुक्त, 1125 पॉझिटिव्ह ; ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,420

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 1125 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 24 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर 1265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 61 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 44 हजार 88 झाली आहे. सध्या 16 हजार 420 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 81 हजार 53 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 14 हजार 491नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथील 83 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45 वर्षीय महिला, नगीना बाग परिसरातील 49 वर्षीय पुरुष, 56 व 65 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 58 वर्षीय पुरुष, सुमित्रा नगर परिसरातील 45 वर्षीय महिला, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 54 वर्षीय पुरुष,38 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 26 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील 60 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील 53,65 व 70 वर्षीय महिला,वरोरा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील 46 वर्षीय पुरुष, भिसी येथील 64 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 29 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील 44 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 929 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 859, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 28, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1125 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 442, चंद्रपूर तालुका 96, बल्लारपूर 86, भद्रावती 12, ब्रम्हपुरी 63, नागभिड 89, सिंदेवाही 03 , मूल 49, सावली 34, पोंभूर्णा 06, गोंडपिपरी 57, राजूरा 40, चिमूर 41, वरोरा 31, कोरपना 30, जिवती 20 व इतर ठिकाणच्या 26 रुग्णांचा समावेश आहे.