समाज माध्यमावर विकृत लिखाण करणाऱ्या प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरेची पाेलिसांसमाेर माफी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , खासदार संजय सिंह आणि अन्य नेत्यांविराेधात समाजमाध्यमांवर सातत्याने विकृत लिखाण करणाऱ्या चंद्रपुरातील प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे यांची आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच जिरविली. पाेलिसात तक्रार करताच या दाेघांचेही धाबे दणाणले. थेट पाेलिस ठाणे गाठून उपगन्लावार आणि खांडरे यांनी माफीनामा लिहून दिला. यापुढे अशी चुक हाेणार, असे म्हणत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची माफीही मागितली.

प्रवीण उपगन्लावार आणि आनंद खांडरे मागील अनेक दिवसांपासून काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांविराेधात समाज माध्यमांवर विकृत लिखाण करीत आहे. या दाेघांनाही अनेकदा समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु आपले कुणीच वाकडे करु शकत नाही, या अविर्भावात त्यांच्या भाषेचा दर्जा घसरत गेला. विकृत आणि विद्वेष वाढत गेला. १६ जून राेजा प्रवीण उपगन्लवार यांना आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटूंबियांविषयी फेसबुकवर अतिशय खालच्या भाषेत गरळ आेकली. त्यावर नेहमीप्रमाणे आनंद खांडरे यांनीही उपगन्लवार यांच्याही शब्दाला लाजवेल, अशा प्रतिक्रीया टाकल्या.

नेहमीप्रमाणे आपले काहीच हाेणार नाही, असा समज करुन या दाेघांनीही समाज माध्यमांवर आपली विकृतीचे प्रदर्शन सुरुच ठेवले. दरम्यान याची माहिती आज आपच्या कार्यकर्त्यांना झाली. आपचे जिल्हा संयाेजक सुनील मुसळे यांनी थेट शहर पाेलिस ठाणे गाठले आणि या दाेघांचीही तक्रार केली. या दाेघांनाही पाेलिसांनी ठाण्यात आणले. त्यानंतर मात्र उपगन्लावार आणि खांडरेचे धाबे दणाणले. गयावया केली. आपच्या कार्यकर्त्यांचा माफी मागितली. एवढेच नाहीत तर दाेघांनीही स्वतंत्रपणे ठाणेदारांना माफीनामा लिहून दिला. यापुढे अशी चूक करणार नाही, अशी कबुली त्यांनी दिली.