चंद्रपूर : बाहेरून आलेल्या एका तृतीयपंथीयाने रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट केली ..तिथे तीला नेगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे सांगण्यात आले नंतर तीला रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळवण्यात आले.संतापलेल्या तृतीयपंथीयाने रुग्णालयात जावून हंगामा केला डॉक्टर ,कर्मचाऱ्यांचा घेेतला समाचार आणि स्वतः व्हिडीओही बनवला.
प्राप्त माहितीनुसार सविस्तर असे की ,चकपिपरी येथील निखिल चौधरी हा युवक तृतीयपंथी असून निक्की नाव त्याने धारण केले आहे.कामानिमित्ताने ती बिहारमध्ये होती. बिहारवरून गोंडपिपरीत आल्यावर सरळ ग्रामीण रुग्णालय गाठून तिने कोरोना टेस्ट करवून घेतली. काही वेळानंतर तिला रिपोर्ट नेगेटिव्ह आली तुम्ही घरी जाऊ शकता असे सांगण्यात आले .निश्चिन्त मनाने ती घरी गेली.
नंतर दोन तीन दिवसांनी फोन करून ‘तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे तिला कळवण्यात आले .संतापलेल्या निक्की ने तडक ग्रामीण रुग्णालय गाठले . स्वतःच्या हक्काप्रती सजग असलेल्या निक्कीने तिथे हंगामा खडा केल. आपल्या खास शैलीत डॉक्टरांचा घेतला समाचार , अशा समगलथान कारभारामुळे कोरोना पसरून लोकांचे जीव जात आहेत. असा आरोप तिने केली. ती त्वेषाने बोलत असताना डॉक्टर क्वार्टर मध्ये दडून बसले होते ! यासंदर्भातला व्हिडीओ सोशल साईडवर वेगाने फिरतो आहे. निक्कीने दाखवलेल्या सजगपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे