इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर : आज रविवारी सकाळी 5:30 वाजता दरम्यान आशिष वर्मा (35) रा. शास्त्रीनगर याने राहते घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
वैशाली आशिष वर्मा (25) रा. शास्त्रीनगर हिचा प्रेमाविवाह आशिष वर्मा सोबत सहा वर्षापूर्वी झाला. नंतर त्यांना चार वर्षाची मुलगी झाली ती आपल्या आई वडिलांच्या शास्त्रीनगर येथे राहत होती. काही दिवसापासून आशिष हा आपल्या पत्नीस दारू पिऊन तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता.
चार दिवसा पूर्वी आशिषने दारू पिऊन चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस मारहाण केली.

भीतीने पत्नी वैशाली हिने घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली व आपल्या मैत्रीणीच्या घरी राहण्यास गेली.
आज रविवारी सकाळी वैशाली हिच्या आईने बाजूच्या खोलीत जाऊन बघितले असता आशिषने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले.
वैशालीच्या वडिलांनी भ्रमणध्वनी वरून तिला ही माहिती दिली तीने लगेच घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

पोलिसांनी पंचनाम करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविला असून मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.