वेकोलि राजीवरत्न रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता होऊ देणार नाही : खासदारबाळु धानोरकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्राचे खासदार बाळु धानोरकर यांनी आज 01 में महाराष्ट्र दिनी घुग्घूस येथील राजीवरत्न केंद्रीय रुग्णालयाला सकाळी साडे दहा वाजता भेट दिली.

कोविड रुग्णाची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर वेकोली वरिष्ठ अधिकारी उदय कावले, सब एरिया पिसारेड्डी व राजीव रतन वैदकीय अधिकारी आनंद यांच्या कडून रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या असता

डॉ. आनंद यांनी रुग्णालयात ऑक्सिजन कमी पडत असल्याचे सांगितले

असता खासदारांनी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता होऊ देणार नसल्याची हमी दिली व तातळीने समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व्हेंटिलेटर युक्त बेड तातळीने निर्माण करण्याच्या सूचना दिल्या व रुग्णालयात कसल्याही प्रकारे समस्या असल्यास तातळीने आपण प्रशासनाची मदद घ्यावी अश्या सूचना खासदारांनी दिल्या आहेत.

रेड्डी यांनी खासदारांना रुग्णवाहिकेची मागणी केली असता एक रुग्णवाहिका तातळीने देणार असल्याचे खासदारांनी कबूल केले.

यासोबतच घुग्घुस गावातील सर्वसामान्य नागरिकांना ही उपचाराची व्यवस्था देण्याचे सुचविले असता सध्या आपल्याकडे डॉक्टर व स्टाफ उपलब्ध नसल्याचे सांगितले. यावर सर्वांना उपचार देण्याची भूमिका आपल्याला घ्यावीच लागणार असे खासदारांनी ठणकावून सांगितले असता आम्ही रुग्णाच्या अवस्थेनुसार घेऊ असे आश्वासन उदय कावले यांनी दिले

याप्रसंगी ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, राजूरेड्डी अध्यक्ष घुग्घुस काँग्रेस, लक्ष्मण सादलावरजी,रोशन पचारे किसान सेल जिल्हाध्यक्ष, पवन आगदारी एस्सी सेल जिल्हाध्यक्ष, कामगार नेते सैय्यद अनवर,युवा नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, गजानन गोहणे, कीशीर बोबडे, प्रेमानंद जोगी, बालकिशन कूळसंगे, आदी उपस्थित होते.