चंद्रपुरात 35 वर्षिय डॉ. प्रशांत चांदेकर यांचा कोरोनाने निधन

• शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होते कार्यरत

चंद्रपूर : राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच कर केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आहे दररोज सुमारे 20 ते 25 कोरोना बाधित मृत्युमुखी पडत आहेत. अशातच नागरिकांची अविरत सेवा करणारे कोविड योद्धे डॉक्टर्स बाधित होत आहेत. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत 35 वर्षिय डॉ. प्रशांत चांदेकर यांचा आज ३० एप्रिल ला कोरोनाने निधन झाले आहे.

डॉ. चांदेकर हे शासकीय वैधकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर व औषधी विभागात कार्यरत होते.
कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली मात्र त्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या बाहुपाशात ओढले.

डॉ. चांदेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना महिला रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. ऑक्सिजन ची पातळी सतत खालावल्याने त्यांना तात्काळ नागपूर ला हलविण्यात येत होते. मात्र वाटेतच वरोराजवळ त्यांचा मृत्यू झाला. या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.