ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला 17 मे पर्यंत टाळेबंदी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• पर्यावरणीय पर्यटनाची सुविधाही बंद राहणार
• रूबाबदार ऐटीत फक्त्त जंगलाचाच राजा करेल वारी
• ऑनलाईन बुकींग केलेल्या पर्यटकांचे पैसे परत मिळणार

चंद्रपूर : कोदशरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दी चैन अंतर्गत राज्यात कडक टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या पंधरवड्यानंतर पुन्हा 15 दिवसाकरिता कडक लाॅकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अधीक कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याच टाळेबंदीचा फटका चंद्रपूरातील ताडोबा अंधरी राषट्रीय प्रकल्पालाही बसत आहे. परत या अभयारण्याला १७ मे पर्यंत टाळेबंदी करिता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस ताडोबा बंद राहणार आहे. पर्यटनाच्या पर्यटनाच्या सर्व सुविधा बंद राहणार असून ऑनलाईन बुकींग केलेल्या पर्यटकांना पैसे परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

वनराईने नटलेल्या आणि वाघांच्या प्रजननासाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प देश विदेशातील पर्यटकांना भूरळ घालते. येथील वाघांची असलेली मोठी संख्या आणि पर्यटकांना होणारे हमखास दर्शन हे ताडोबाचे वैशिष्ठ्य आहे. त्याबळावर ताडोबा देश विदेशात नावाजलेला व्याघ्रप्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. रूबाबदार प्रण्यांच्या संख्येबरोबरच पर्यटकांसाठी उत्तम निवास आणि सफारी व्यवस्था उपलब्ध आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु आता पंधरा‍ दिवस कडक निर्बंधासह लावण्यात आलेली टाळेबंदीचा फटका येथील रोजगाराला बसणार आहे.
दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू लागू करण्यात आले.
नव्या नियमावलीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आणि सर्व प्रकारच्या पर्यावरणीय पर्यटनाची सुविधा १५ एप्रिलपासून तर ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परत लाॅकडाऊनला पंधरा दिवसांकरीता मुदतवाढ देण्यात आल्याने १७ मे पर्यंत ताडोबा बंद राहणार आहे. दरम्यानच्या ज्या पर्यटकांनी “माय ताडोबा” या वेबसाईटवरून ताडोबा सफारीचे बुकींग केले असेल त्यांना बुकींगसाठी भरलेली पूर्ण रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून परत केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत ही रक्कम संबंधित पर्यटकांच्या ईवॉलेटमध्ये पाठविली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वेगवेगळ्या संकटात पर्यटकांच्या सोबतीला असणारा ताडोबा राष्ट्रीय प्रकल्प आता पंधरवाड्याकरिता शांत असणारआहे. दरविदशी दोन पाळीत आणि बफर व कोअर झोन मधून होणारी पर्यटनाची सफारी शांत राहणार आहे. पर्यटकांच्या जिप्सीमध्ये बसून होणाऱ्या नेहमीच्या वारीने ताडोबातील टाइगर, बिबट आणि इतर प्राणी मात्र मनमुरादपणे आपल्या क्षेत्रात भ्रमंती करणार आहेत. ऐरवी पर्यटकांरिता होणारी सफारी आता टाळेबंदीने रूबाबदार आणि जंगलाच्या राजाचीच खरी वारी ठरणार आहे.