खासगी बस मध्ये तरुणीचा विनयभंग

0
1267
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पुणेवरून चंद्रपूरला येणा-या बस मधील घटना

चंद्रपूर : पुणे येथून नौकरीचे काम आटोपून चंद्रपूरला परत येणा-या खासगी बसमध्ये २०वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना काल रविवारी उघडकीस आली आहे.

मात्र रामनगर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रोशन यादव यांनी तात्काळ तरुणीच्या तक्रारीची दखल घेत DNR ट्रॅव्हल्सच्या वाहकावर कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. वाहक मंगेश रामरतन साखरवाडे असे आरोपीचे नाव आहे.
रात्री 9 वाजताच्या सुमारास जेव्हा ही बस जालना येथे पोहचली असता बसमधील आरोपी वाहक मंगेश रामरतन साखरवाडे यांनी त्या तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत, त्या तरुणीला मोबाईल क्रमांक विचारत मला तुझ्याशी पर्सनल बोलायचे आहे, बसमध्ये पॅसेंजर असल्याने मी बोलू शकत नाही असे म्हणत तो त्या तरुणीच्या मागे मागे जाऊ लागला.

अचानक घडलेल्या या प्रकाराने ती तरुणी घाबरून गेली, रात्रभर मंगेशने त्या तरुणीच्या मोबाईलवर कॉल केले, त्यानंतर तरुणीने आपल्या भावाला हा घटनाक्रम सांगितला असता त्यांनी कॉन्फरन्स कॉल वर मंगेशला चांगलेच धारेवर धरले. मात्र त्यानंतर तो न घाबरता तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फोन करीत होता.
26 फेब्रुवारीला DNR ट्रॅव्हल्स चंद्रपूरला पोहचली असता मंगेश पुन्हा त्या तरुणी जवळ जात मला तुमच्याशी पर्सनल बोलायचे होते पण तुम्ही भावाला सांगितले, त्यानंतर मंगेशने तरुणीला हातवारे करीत इशारे करू लागला.

दोन दिवसानंतर या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली. यावरून पोलिसांनी कार्यवाई करण्यात आली.