चंद्रपूर : 1044 कोरोनामुक्त, 1458 पॉझिटिव्ह तर 25 मृत्यू, ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,809

• चंद्रपूर मनपा क्षेत्र, वरोरा, भद्रावती, कोरोना मध्ये बाधितांची वाढ सुरूच

• 24 तासात जिवती तालुक्यात एकही बाधिताची नोंद नाही

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 1458 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 25 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर 1044 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 62 हजार 895 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 45 हजार 132 झाली आहे. सध्या 16 हजार 809 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 84 हजार 693 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 16 हजार 906 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील सरकार नगर येथील 73 वर्षीय पुरुष, कृष्णानगर येथील 38 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 43 व 63 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील संतोषीमाता वार्ड येथील 54 व 73 वर्षीय पुरुष, विसापूर येथील 75 वर्षीय महिला,42 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 64 वर्षीय पुरुष, धानोरा येथील 62 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील 41 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, विनायक लेआउट परिसरातील 51 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 58 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर परिसरातील 78 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, टिळक नगर येथील 45 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 954 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 884, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 28, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1458 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 352, चंद्रपूर तालुका 84, बल्लारपूर 87, भद्रावती 110, ब्रम्हपुरी 66, नागभिड 25, सिंदेवाही 99 , मूल 79, सावली 49, पोंभूर्णा 21, गोंडपिपरी 42, राजूरा 52, चिमूर 57, वरोरा 203, कोरपना 118, जिवती 00 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.