स्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• रोजगार न दिल्यास दीडशे वाहनाने वॉशरीजचा घेरावाचा ईशारा

चंद्रपूर : घुग्घुस परिसरातील उसगाव येथे महामिनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लि. ही वॉशरीज मागील चार महिन्यांपूर्वी शुरू झालेली आहे.

याठिकाणी कोळसा वाहतुकीचे कंत्राट पी.टी.सी, ऐ. एल. पी.एल, डी.एन.आर, अमान, बालाजी या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना देण्यात आले विशेष बाब म्हणजे बालाजी ही कंपनी स्थानिक नेत्यांचीच आहे या ट्रान्सपोर्ट कंपन्या तर्फे स्थानिक मोटार मालकांचा शोषण करण्यात येत आहे. डिजलचे दर दररोज वाढत असतांना हे ट्रान्सपोर्टर स्वतः मोठा कमिशन ठेवून स्थानिक मोटार मालकांना अत्यअल्प भाडे देण्यात येत असल्याने स्थानिक चालक मालकांना तोटा सहन करावा लागत आहे.

हे ट्रान्सपोर्टर मनमर्जी व बळजबरीने स्थानिक चालक मालकांचा गैरवापर करीत आहे. घुग्घुस परिसरातील दीडशे चालक मालकांनी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष यांना आपल्यावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली असता आज 17 जून रोजी राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चालक मालकांनी उसगाव येथे धडक दिली.
शिष्टमंडळाने वॉशरीजचे जनरल मॅनेजर प्रकाश राव, प्लांट हेड प्रशांत अतकरे, हेच आर विशाल इंगळे, कमर्शियल मॅनेजर संजय सरागे यांना चालक मालक यांना सरळ कोळसा वाहतुकीचे कंत्राट देण्याची मागणी करण्यात आली.

यामध्ये कुठलेही कमिशन अंजेट ठेवायचे नाही येत्या आठ दिवसांत स्थानिक चालक मालकांना कोळसा वाहतुकीचे कंत्राट न दिल्यास संपूर्ण दीडशे वाहन वॉशरीज समोर उभे करून बेमुद्दत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, श्रीनिवास गोस्कुला, राकेश खोब्रागडे, ओमप्रकाश सिंग,मोसम शेख,रियाज अहमद, नुरूल सिद्दीकी, बालकिशन कुळसंगे, संपत कोंकटी व मोठया संख्येने चालक मालक उपस्थित होते.