महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती काँग्रेस कार्यलयात संपन्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ज्येष्ठ नेते निरंजन डंभारे यांचे स्वागत

घुग्घुस : जगाला शांती व अहिंसेचे मार्ग दाखवणारे जागतिक अहिंसेचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाला जय जवान जय किसानचा मूलमंत्र देणारे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात उत्साहात संपन्न करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी व किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे मालार्पण करून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

आज देशाची वाटचाल सध्या हुकूमशाहीच्या दिशेने चालत असुन देशात जाती – पाती व गटा तटाचे द्वेषपूर्ण वातावरण निर्माण केल्या जात आहे. करिता आज देशाला गांधी विचारांची अत्यंत आवश्यक आहे.

जयंती कार्यक्रमात नुकतेच भाजप मधून काँग्रेस पक्षात आलेले ज्येष्ठ नेते निरंजन डंभारे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, निरंजन डंभारे, प्रफुल हिकरे, शेख शमीउद्दीन, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, प्रेमानंद जोगी, नागेश कुचनकर, सुनील पाटील, स्वागत बुरचुंडे,याकूब खान, जुबेर शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.