चंद्रपूर महानगरपालिका झोन क्रमांक 3 चे सभापती अंकुश सावसाकडे यांचा कोरोनामुळे मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात सामान्य नागरिकांसह जनप्रतिनिधी सुद्धा आले आहे, चंद्रपूर महानगरपालिका झोन क्रमांक 3 चे सभापती अंकुश सावसाकडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अंकुश सावसाकडे हे भाजप पक्षाचे कार्यकर्ते तथा इंदिरा नगर प्रभागाचे नगरसेवक होते, कोरोना संसर्ग झाल्यावर त्यांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आणण्यात आले, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.

नगरसेवक सावसाकडे यांच्या मृत्यूने शहर भाजप मध्ये शोकमग्न वातावरण आहे.