दोन व्यवसायिकांत ग्राहकांवरुन ‘राडा’, टाळेबंदी असतांना दुकाने उघडलीच कशी?

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• इलेक्ट्रॉनिक वस्तू अत्यावश्यक सेवेत आहे का?
• शटर खाली आणि ग्राहक आत ..!

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्ह्यात दिनांक 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सेवा वगळता फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा सुरु असताना बाजारपेठेतील दोन व्यवसायिकांत ग्राहकावरून “राडा” झालाच कसा? हा भाग प्रशासनाने तपासणे गरजेचे झाले आहे.

वणी शहरात बाजारपेठेतील आझाद इलेक्टॉनिक्स व मयूर इलेक्टॉनिक्स अशी दोन दुकाने सामोरा-समोर आहेत. दि. 27 एप्रिल ला सकाळी 10. 30 वाजता या दोन्ही दुकानाच्या मालकांनी एकमेकांवर हल्ला चढवला. कारण केवळ एकमेकांचे ग्राहक का बोलावले अशी विश्वसनीय माहिती आहे. प्रकरण पोलिसात गेले दोन्ही पार्ट्यांना मेडिकल साठी पाठविण्यात आले. मात्र या प्रकरणी त्या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला नाही. कारण आपसी समझोता झाल्याची वार्ता सर्वत्र पोहचली. परंतु या मारहाणीत काहीतरी ‘गोम’ असल्याची भनक ठाणेदार वैभव जाधव यांना लागली. त्यांनी याप्रकरणी विस्तृत माहिती संकलित केल्यानंतर दि. 30 एप्रिल ला गुन्हा नोंद केला.

आझाद इलेक्टॉनिक्सचे मालक आकाश राजकुमार अमरवाणी 29 हे जखमी झाले होते त्यांच्या तक्रारीवरून करण मुकेश बत्रा 24, पुनीत मुकेश बत्रा 29 व मनीष बत्रा 45 सर्व रा. वणी या तिघांवरही भादंवि च्या कलम 294, 323, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आरोपीच्या माध्यमातून करण्यात आला मात्र ठाणेदारांनी अखेर गुन्हा नोंद केला आहे परंतु टाळेबंदी असताना सदर आस्थापना उघडी कशी होती? याबाबत सुद्धा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होणे अभिप्रेत आहे.