ऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे एक हात मदतीचा

भद्रावती (चंद्रपूर) : ‘नुपरीत तेरावा महीणा’ ही म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. आणी हीच वेळ आली तालुक्यातील पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी कामगार विठ्ठल वर… ऐन दिवाळीत विठ्ठलचे घर जळाले… आणी दिवाळीत दिव्यांची रोषणाई करुन गोळधोळ करुन खाण्याच्या सणाच्याच दिवसी विठ्ठल हतबल झाला… ही घटना सामाजिक कार्यकर्ते भास्कर ताजने, संदिप खुटेमाटे, अनुप खुटेमाटे यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे रविंद्र शिंदे यांना सांगितली. तसेच रवि शिंदे पिपरी (देशमुख) येथे आज (दि.३) ला पोहोचले व विठ्ठल ला आधार व हिंमत देत मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

झाल अस की, पिपरी (देशमुख) येथील रहिवासी विठ्ठल रमेश मोहितकर हे दृष्टीहीन वडील रमेश मोहितकर व मानसिक दृष्टया आजारी आई सिंधूबाई मोहितकर यांचेसह वास्तव्य करतात. विठ्ठल हे रोंजदारीवर मजुरीच्या कामाला जातात. नुकतेच विठ्ठलने दिवाळीनिमीत्त घराला नविन ताट्या आणी प्लास्टीक लावले होते. आज (दि.३) ला सकाळी ७:३० च्या सुमारास अचानक सिलेंडरच्या स्पोटाने त्यांच्या राहत्या घराला आग लागली. गरीबी व दुष्काळात जिवन जगणा-या विठ्ठलच्या कुटुंबावर हा मोठा आघात आहे. लोकसेवेचे कार्य सातत्याने सुरु असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टला सामाजिक कार्यकर्ते भास्कर ताजने, संदिप खुटेमाटे, अनुप खुटेमाटे यांनी मदतीची हाक दिली व रवि शिंदे ताबडतोब मदत घेवु पिपरी (देशमुख) गावात पोहोचले. विठ्ठलच्या झोपडीतील जळालेल्या सामानांची पाहणी केली, कुटूंबीयांना हिंमत दिली व मदतीचा धनादेश सुपूर्द केला व भविष्यात पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

यावेळी भास्कर ताजने, संदिप खुटेमाटे, अनुप खुटेमाटे, भाऊराव खुटेमाटे, मुरसाचेचमाजी सरपंच विलास घोटकर, बळीराम रोडे, गुणवंत खुटेमाटे, नीतीश खुटेमाटे, प्रतिक खुटेमाटे, गोविन्दा आसुटकर, नथ्थु कामटकर, तमुस अध्यक्ष अमोल क्षिरसागर, पंढरी कुटेमाटे, मोहन दर्वे, राकेश कुचनकर, धर्मा कामटकर आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत पिपरी (देशमुख) यांनी ट्रस्टचे आभार मानले.