• आजाराला कंटाळली होती शिक्षिका
चंद्रपूर : पोटाच्या आजाराला कंटाळलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने घराच्या सछतावरील सिंटेक्स टाकीत उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारी (३ मार्च २०२१) रात्री उघडकीस आली. वैशाली दशरथ विधाते रा.मुकुटबन , ता . झरी जी. यवतमाळ असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
सूत्रानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून वैशाली विधाते ह्या पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या. अनेक डॉक्टरांकडे उपचार करूनही प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्याच्या पोटाचा आजार वाढतच गेल्याने त्यांना आजार असह्य होत होता.
अखेर काल बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी आपल्याच घराच्या छतावरील एक हजार लिटरच्या सिंटेक्स च्या टाकीत तिने उडी घेवून जिवनयात्रा संपविली. तिच्या पश्चात पती दशरथ झितृजी विधाते हे आश्रम शाळा मारकी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर दोन मुली आहे. सायंकाळ च्या सुमारास त्या घरी आढळून न आल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली असता त्यांचा मृतदेह पाण्याने भरलेल्या टाकीत आढळून आला. मुकुटबन पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेतला.
पुढील मुकूटबन पोलीस तपास करीत आहे.