घुग्घुस : येथील शांतीनगर येथे राहणाऱ्या एका 70 वर्षीय वयोवृद्धेवर बलात्कार झाल्याची घटना आज शुक्रवारी (4 जून) ला सकाळी उघकीस आली. या घृणास्पद सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
येथीलच एका युवकांने एक 70 वर्षीय वयोवृद्धेवर बलात्कार केला. या बाबत पीडिताने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे.अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
सदर घटनेची माहिती होताच चंद्रपूर एसडीपीओ यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे आज सकाळी भेट दिली तर जिल्हा पोलीस अधीक्षक हे देखील भेट देणार असल्याची माहिती आहे.