घुग्घुस : येथील स्वयं सहायता समूह महिला संस्था तर्फे वेकोलीच्या इंदिरा नगर कॉम्प्लेक्स येथे पेपर प्लेट, चिवडा प्लेटच्या लघु उद्योगाला सुरुवात करण्यात आली.
आज याचे विधिवत उदघाटन घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, इंटक नेते लक्ष्मण सादलावार यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना काळात महिला समूहाने तर्फे स्वयंरोजगाराला सुरुवात करून इतरांन पुढे एक आदर्श ठेवल्याचे मत रेड्डी यांनी ठेवले. याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, युवक उपाध्यक्ष सिनू गुडला, विजय माटला, कुमार रुद्रारप,बालकिशन कूळसंगे,सुनील पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी महिला समूहाच्या अध्यक्षा त्रीवेणी पदमा सदानंद,सचिव श्रीलता भानेश सोदारी,रूपा राकेश गोदारी,तिरुमला अंजय्या गोपाला,ममता विनोद वांढरे, सरोजा अंबादास ढोरके,सारूबाई राजन्ना गोदारी, श्रीमती संध्या मंडल, श्रीमती दुर्गा पाटील आदी उपस्थित होते.