• दोन जण जखमी; काहीं जीव वाचवित पळाले
• नागरिकांनी पिटाळून लावले अस्वलाला
चंद्रपूर : शहराला लागून असलेल्या माना टेकडी परिसरात आज शुक्रवारी मॉर्निंग वॉक ला गेलेल्या नागरिकांवर हल्ला केला. यात एक जण जखमी झाला असून काहींनी आपले जिव वाचवित अस्वलाला पळता भूई करून सोडले. या घटनेमुळे मॉर्निंग वॉक ला जाणा-या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या माना टेकडी परिसरात पठाणपुरा, व शहराच्या विविध भागातील नागरिक मॉर्निंग वॉक ला जातात. आज शुक्रवारी बरेच नागरिक मॉर्निंग वॉक ला गेले होते. दरम्यान या परिसरात वावर असलेल्या अस्वलाने हल्ला केला. यात सुनील लेनगुरे व महेश गुडेट्टीवार जखमी झाले. तर काहींनी जिव मुठीत घेवून अस्वलाला पळवून लावण्यासाठी पुढाकार घेतला आणि पळता भुई करून सोडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
आठवडाभरापासून रॅपिड रिस्पोंइसिव टीम मानाटेकडी परिसरात अस्वलाचा वावर असल्याची माहिती होती, मात्र त्यांनी नागरिकांना खबरदार केले नाही. परंतु वेळीच नागरिकांनी सावधानता बाळगल्याने अनेकांना आपले जीव वाचविता आले. माना टेकडी परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालं आहे. परंतु या घटनेने मार्निंग वादक ला जाणारे नागरिकां वाट चुकवावी लागणार आहे.