आमदार किशोर जोरगेवार यांनी केली वर्धा नदीची पाहणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• पाण्याचा प्रवाह वळवून करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना

चंद्रपूर : तालुक्यातील सात गावांचा पाणी पूरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर गावांच्या पूरवठा विहीरींना पाणी पूरवठा करणा-या धानोरा येथील वर्धा नदीची पाहणी करत पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सुचना संबधीत विभागाला केल्या आहेत. यावेळी धानोरा सरपंच छाया वासाडे, पिपरीच्या सरपंच वैशाली चंन्दू मातने, सिदुरचे सरपंच मथे, वेंडलीच्या सरंपच प्रतिमा अलवलवार, नागाडाचे सरपंच, शेणगावच्या सरपंच यांच्याासह सामाजीक कार्यकर्ता नंदु वासाडे, धानोराच्या ग्रामपंचायत सदस्या मनिषा ढावरी, पिपरीचे उपसरपंच हरिओम पोटवले, सदस्या मुसडे, भवन चिने, वर्षा निर्बड, वेंडलीचे उपसरपंच राज कुमार नागपूरे, शिधूरचे उपसरपंच गानफाडे, सदस्य सुनील इग्रपवार, समाजीक कार्यकर्ता गणपत कुडे, प्रकाश अलवलवार आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर तालुक्यातील पिपरी, धानोरा,सिदून,वेंडली,शेणगाव,चिंचाळा,नागाला वांढरी गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या गावांना पाणी पूरवठा करणा-या पूरवठा विहीरींची पाणी पातळी खालावल्याने या गावांवर पाणी टंचाईचे संकटचे संकट ओढावले आहे. याची दखल घेत आज आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चिंचाळा अंतर्गत धानोरा येथील वर्धा नदीची पाहणी केली.यावेळी वर्धा नदीच्या पाण्याचा प्रवाह दुस-या बाजूने वळला असल्याने ही पाणी टंचाई उध्दभवली असल्याचे निदर्शनास आले. याचा परिणाम पाणी पुरवठा करणार्या विहिरींवर झाला असुन या विहीरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

त्यामुळे सदर गावांत भीषण पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.. त्यामूळे जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा प्रवाह बदलवित योग्य उपाययोजना करुन तालुक्यातील पिपरी,धानोरा,सिदून,वेंडली,शेणगाव,चिंचाळा,नागाला वांढरी गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी प्रशासनाला केल्या आहेत.