नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या बद्दल विकासपुरुष मा. आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे जाहीर आभार
वनसडी : नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.विनाताई मालेकर यांच्या हस्ते करण्यात आले .प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा ला रुग्णवाहिकेची नितांत गरज होती जि. प.सदस्या विनाताई मालेकर यांनी वेळीवेळी विकासपुरुष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे , पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार , खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्याकडे पाठपुरावा करून नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळवून घेतली.
सदर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला कोरपणा पंचायत समितीच्या उपसभापती सौ.सिंधुताई आस्वले , श्री. मा.श्यामभाऊ रणदिवे माजी सभापती तथा सदस्य पं.स. कोरपना, आरोग्य अधिकारी श्री स्वप्नील टेंभे,डॉ. दीक्षा ताकसांडे, श्री.मा.सुरेश पा मालेकर समाजसेवक, श्री.मिलिंद भाऊ ताकसांडे ग्रा.प.सदस्य नारंडा तथा संजय गांधी निराधार सदस्य कोरपना, श्री. प्रकाश भाऊ मोहूर्ले युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष, तथा रुंगालायचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते .
प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल विकासपुरुष लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाष भाऊ धोटे , पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार , खासदार बाळूभाऊ धानोरकर साहेब यांचे उपस्थितांनी मनपूर्वक आभार मानले