चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नारंडा – वनोजा लगत मागील अनेक वर्षापूर्वी मुरली अग्रो सिमेंट कंपनी या नावाने औद्योगिक कारखाना सुरू करण्यात आला होता सदर कारखाना सुरू होऊन सिमेंटचे उत्पादन सुद्धा बाजारपेठेमध्ये विक्रीला आलेले होती.
मात्र कंपनीचे मालक प्रशासकीय अधिकारी व कामगार स्थानिक परिस्थिती यामुळे हा कारखाना डबघाईला आला बंद पडला. मात्र या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांवर ती उपासमारीची पाळी आली अनेक कामगारांचे एक एक दोन दोन वर्षाचे वेतन रखडले पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळा मार्ग पत्करला सुरुवात केली.
शेवटी प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट झाले मध्यवर्ती कालावधीमध्ये दालमिया सिमेंट भारत यांनी हा कारखाना आपल्या आधिपत्याखाली अधिकृत केला मात्र जुन्या कामगारांचा प्रश्न जैसे थे राहिला अनेकांचे वेतन रखडले उपासमारीची पाळी आली स्थानिकांचा रोजगार हिरावला गेला अनेकांच्या शेत जमिनी कारखान्याने काबीज केल्या रोजगार मात्र कोणालाही मिळाला नाही.
दालमिया ग्रुपने कारखान्याला सुरुवात केल्यानंतर कारखान्याची डागडुजी करत शेवटी उत्पादन सुद्धा सुरू झाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार जुन्या कामगारांना सामावून घेण्यात येईल जमीन हस्तगत झालेल्या लोकांना पुनश्च रोजगार मिळेल अशा अनेक आशा-अपेक्षा कामगारांमध्ये पल्लवीत झाल्या मात्र दालमिया ग्रुपने स्थानी कारखान्यामध्ये कामगार व मजूर पुरवठा करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या स्थापन केल्या व त्यांच्या माध्यमातून ठराविक पगार देऊन जुन्या कामगारांना आमंत्रित केले. मात्र तुटपुंज्या पगारावर पोटाची खळगी कशी भरणार शिवाय जमीन हस्तगत झालेल्या लोकांनी काय करावे? या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना मिळणारा तुटपुंजा पगार शिवाय कंपनी व्यवस्थापनाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून होत असलेला परप्रांतीय मजुराचा भरणा यामुळे स्थानिक कामगार व परिसरातील बेरोजगार युवक यांच्या भावना ऐकून तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये कामगाराचे हीत जोपासण्यासाठी माजी खासदार नरेश पुगलिया त्यांचे सहकारी साईनाथ बुचेे, शिवचंद्र काळे, नंदू बिलारिया, सिद्धार्थ वानखेडे, पांंडुरंग खिरडकर, नंदू बिलारिया यांनी कंबर कसली असून स्थानिक सिमेंट कंपनी मध्ये रोजगार देताना स्थानिकांना प्राधान्य द्या जुन्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनामध्ये सामावून घ्या परप्रांतीयांचा भरणा कमी करा जुन्या कामगारांची थकबाकी त्वरित कामगारांच्या खात्यावरती जमा करा अशा अनेक मागण्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिला आहेे.