चंद्रपूर : कोरोनाने मागील दीड वर्षा पासून थैमान घातले असुन अशा महासंकट काळात डॉक्टर,नर्स,आशा वर्कर्स,पोलीस विभाग,रुग्णवाहिका चालक,इत्यादी सह पत्रकारांची भुमीका ही कौतुकास्पद असुन जिवाची पर्वा न करता अविरत पणे कोरोना महामारीत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी पत्रकार बांधव आपल्या लेखणीतून जनतेपुढे मांडत आहे.
यांचाही समावेश कोरोना योद्धांच्या श्रेणीत असून यांच्या कार्याची कुठेतरी प्रशंसा व्हावी असे मत गडचांदूर भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार यांनी व्यक्त केले. केंद्रातील मोदी सरकारच्या सप्त वर्ष पुर्तीचे औचित्य साधून गडचांदूर भाजपाच्या वतीने नुकताच आयोजित भाजपा कार्यालयात पत्रकार बांधवांच्या एका छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते.
कोरोना योद्धांचा सत्कार करुन पत्रकारांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने वित्त व नियोजन तथा लोकलेखा समीती चे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,यांच्या सूचनेनुसार माजी आमदार अँड संजय धोटे,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महिला अध्यक्ष कु. अल्काताई आञाम,यांच्या मार्गदर्शनखाली गडचांदूर भाजपाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून पौष्टिक फळे, छत्री, मास्क, व आरोग्य दायी होमियोपैथी गोळ्या भेट देवुन स्थानिक पञकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. कोरोना महामारीत भाजपचे योगदान उल्लेखनीय असुन सत्कार केल्या बद्दल उपस्थित पञकार बांधवांनी संबधीतांचे मनापासून आभार मानले. या वेळी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतिश उपलेंचवार, नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक अरविंद डोहे,संदीप शेरकी,इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक नगरसेवक अरविंद डोहे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप शेरकी यांनी मानले.