
चंद्रपूर :चिमूर तालुक्यातील व नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या काग या गावातील दिपक घनश्याम धोंगडे वय २४ वर्षे या युवकाने शुक्रवारी रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आत्महत्येचे कारण कळू शकले नसून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मंगेश मोहोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.