हिंगणघाट : शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणाची आज ५ एप्रिलला शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सरकारि वकील ॲड. उज्वल निकम यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली आहे.यावेळी एकूण ५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून यामध्ये सर्व पोलिस तपासातील पोलिस अधिकारी होते. पाच साक्षीदारांची उलटतपासणी बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने यांनी केली.
हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणात आज नोंदविण्यात आली ५ साक्षीदारांची साक्ष pic.twitter.com/OLZe09Y0Hm
— News Post (@NewsPost5554) April 6, 2021
यामुळे आतापर्यंत या प्रकरणात एकुण २१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.उद्याला या प्रकरणातील महत्वाची साक्ष समल्या जाणाऱ्या तपास अधिकारी उपविभागिय पोलिस अधीक्षक तुप्ती जाधव व हिंगणघाटचे तत्कालीन ठाणेदार सत्यविर बंट्टीवार यांची साक्ष होणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे..