लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – आमदार सुभाष धोटे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• गडचांदूर येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा शुभारंभ

चंद्रपूर : १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस मिळणार असून लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गडचांदूर येथे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरणाचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांना योग्य खबरदारी घेवून आपल्या स्वतःच्या आरोग्याची तसेच लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची सुध्दा काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनी शासन, प्रशासनाच्या सुचनांचे योग्य पालन करुन सहकार्य केल्यास आपण सर्व मिळून लवकरात लवकर कोरोनावर मात निश्चितपणे करू शकतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, नगराध्यक्षा सविता टेकाम, उपनगराध्यक्ष शरद जोगी, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, जेष्ठ नेते अरुण निमजे, पाप्पया पोन्नमवार, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, संतोष महाडोळे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, आरोग्य सभापती राहूल उमरे यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.