कोळसा भरलेला ट्रक वर्धा नदीत कोसळला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : वेकोलीच्या मुंगोली खाणीतून कोळसा भरून सप्रा ट्रान्सपोर्ट कंपनीचा 18 चाकी ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 1244 घुग्घुस येथील रेल्वे सायडींग वर कोळसा खाली करण्यासाठी मुंगोली वर्धा नदीच्या पुलावरून जात असतांना अचानक समोरून येणाऱ्या एका ट्रक ने कट मारल्याने कोळसा भरलेल्या ट्रक चालकाचे वाहना वरून नियंत्रण सुटल्याने थेट पुलावरून वीस मिटर खोलात नदीत कोसळला. घटना आज शुक्रवारी सकाळी घडली.

ट्रक चालक सुनील साखरे (35) रा. गडचांदूर हा या अपघातात थोडक्यात सुदैवाने बचावला. अपघाताची माहिती मिळताच सप्रा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कामगारांनी चालकास नदीच्या पत्रातून बाहेर काढले या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

घुग्घुस – मुंगोली वर्धा नदीच्या पुलावर मोठं मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे यापूर्वी असेच कोळश्याचे ट्रक याच पुलावरून नदीत कोसळले परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व वेकोली व्यवस्थापनाने या पुलाची डागडुज्जी केली नाही.या पुलावरून वेकोलीचे कामगार व मुंगोली साखरा कोलगाव येथील गावकरी याच पुलावरून ये-जा करतात.

तसेच वेकोलीच्या पैंनगंगा, मुंगोली, कोलगाव या कोळसा खणीतून कोळसा वाहतूक करणारे अनेक जड वाहने याच पुलावरून ये-जा करीत असतात. अपघाताचे सत्र सुरु असतांना ही वेकोली व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाच्या डागडुज्जी कळे दुर्लक्ष करीत आहे.