CSR फंड द्वारे व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड उपलब्ध करा: शिवसेना घुग्घूसची मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घूस मध्ये कोरोना पेशंट वाडत असल्याने त्यांना उपचारा साठी चंद्रपूर ला जावे लागत आहे काही लोकांना व्हेंटिलेटर नाही मिळत असल्याने त्रास होत आहे.आज दिनांक 6 मे रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घूस शिवसेनेच्या वतीने प्रभारी शहर प्रमुख सतीश भाऊ बोंडे यांचा नेतृत्त्वात एसीसी कंपनी व लाइट्स मेटल या कंपनीला सी एस आर फंड द्वारा व्हेंटिलेटर/ ऑक्सीजन बेड घुग्घूसवासियांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदन देताना शिवसेना प्रभारी शहर प्रमुख सतीश भोंडे, माजी शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, युवासेना घुग्घूस चेतन बोबडे , अवि डोहे आदी उपस्थित होते.