पेट्रोल पंपा वरील नागरिकांना लॉलीपॉप वाटून काँग्रेस तर्फे केंद्र शासनाचा निषेध

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : ” बहोत हुई महेंगाई की मार” अब की बार मोदी सरकार ” “अच्छे दिन आयेगे ” म्हणत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने देशातील लोकांचे जगणेच कठीण केलेले आहे.

एकीकडे कोरोना महामारीच्या काळात संचारबंदी, लॉकडाऊन मूळे देशातील नागरिकांचे व्यापार, रोजगार बुडाले सर्वसामान्य जनतेला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असतांना व दुसरीकडे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे दर कमी होत असतांना नागरिकांना कमी दरात पेट्रोल – डीजल उपलब्ध करून देण्या ऐवजी पेट्रोल शंभरीपार नेले तर डीजलच्या किमतीत मोठी वाढ करून नागरिकांना मोदी शासनाला निवडून देण्याची शिक्षा देण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या दरवाढी निषेधार्थ घुग्घुस शहर काँग्रेस, किसान काँग्रेस, एस्सी सेल, युवक काँग्रेसतर्फे श्री गुरुकृपा पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांना लॉलीपॉप वाटप करून ” मोदी सरकार मुर्दाबाद” मोदी सरकार हाय – हायचे नारे देत मोदी शासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळेस घुग्घुस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, एस्सी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, अजय उपाध्ये, शेखर तंगलापल्ली, प्रफुल हिकरे, जावेद कुरेशी, सिनू गुडला, विजय माटला,इर्शाद कुरेशी, शहजाद शेख,बालकिशन कुळसंगे, विशाल मादर, नुरूल सिद्दीकी,रोशन दंतलवार, सचिन कोंडावार,रमेश रुद्रारप,कुमार रुद्रारप,निखिल पुनघंटी, संपत कोंकटी,राजकुमार मूळे, शीतल कांबळे,सुनील पाटील,रंजित राखूडे, स्वागत बुरचुंडे, व मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.