सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, १८ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये १५ महिलांचा समावेश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला आज (दि. ७) भीषण आग लागली. या आगीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १५ महिलांचा समावेश असल्याचे समजते आहे. घटनास्थळी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या अरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. सॅनिटाइझर तयार करणाऱ्या एसव्हीएस कंपनीला ही भीषण आग लागली. या आगीमुळं कंपनीमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रय्तन करण्यात आला. तहसीलदार अभय चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून बाचाव कार्याचा आढावा घेतला.

आग लागेल्या एसव्हीएस कंपनीमध्ये सॅनिटायझरचं उत्पादन केलं जातं. सॅनिटायझर हे अत्यंतत ज्वलनशील असतं, त्यामुळं आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.