ओबीसींना राजकिय आरक्षण व पदोन्नती मधिल आरक्षण न मिळण्याचे महापाप बीजेपीचे : नाना पटोले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• केंद्राने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी : डॉ. अशोक जिवतोडे

• राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा

चंद्रपूर : नाना पटोले यांनी विशेष वेळ काढून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित बैठकीत ओबीसींच्या विविध विषयावर आज (दि.८) ला सविस्तर चर्चा केली. यावेळी ओबीसींना राजकिय आरक्षण व पदोन्नती मधिल आरक्षण न मिळण्याचे महापाप बीजेपीचे असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. या अगोदर केंद्र व राज्यात सत्ता असतांना बीजेपीने ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे केंद्राच्या अखत्यारीत असुनही केंद्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे व महासचिव सचिन राजुरकर यांच्या हस्ते आमदार नानाभाऊ पटोले यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, इतर मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करा व ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याबाबत निवेदन दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत दिनेश चोखारे, प्रकाश देवतळे, रामू तिवारी, डॉ. अविनाश वारजुरकर, जयंता पा. जोगी, प्रेमलाल पारधी, कुणाल चहारे, शामभाऊ लेडे, मनोजभाऊ गौरकार, देवराव दिवसे, अनिल दागमवार, राजू हिवंज, दिलीप पायपरे, सुनिल कोहपरे, लीलाधर तिवाडे, विलास भोयर, श्रीकृष्ण लोनबळे,विनोद आगलावे,गणेश कागदेलवार, श्रीमती रजनी मोरे, सुरेखा वांढरे, मंजुषा फुलझेले, विजया बोढे, रवि देवाळकर, विजय मालेकर, लिलाधर खंगार, रजनीताई मोरे, आदी उपस्थित होते.