चंद्रपूर : कोरोनाच्या महामारीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहे त्यातील ताडाळी आणि घुग्गुस येथे देण्यात आलेल्या रुग्णवाहीचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी ताडाळी ग्राम पंचायत सरपंच संगीता पारखी, डॉ. माधुरी मेश्राम तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. व्यंकटेश भंडारी वैद्यकीय अधिकारी, डॉ. दामिनी थेरे वैद्यकीय अधिकारी, डॉ. अनिल वराटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. परम वाकडकर, रवी पोचमपल्लीवार आरोग्य सेवक व गावातील नागरिकांची उपस्थिती होती
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाने रुग्णसंख्या वाढीमुळे चंद्रपुरातील आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला होता. परिणामी आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णवाहिका जुन्या झालेल्या असून काही नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने जिल्हा ठिकाणी हलविण्याच्या दृष्टीने अडचण निर्माण होत होती. हीच अडचण लक्षात घेत महाराष्ट्र शासना तर्फे रुग्णवाहीका जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता उपलब्ध झालेल्या आहे.
त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ताडाळी आणि घुग्गुस येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडला. या रुग्णवाहिकेमुळे सभोवतालच्या परिसरातील रुग्णांना अद्यावत रुग्णवाहिकेची सेवा प्राप्त होऊन त्यांना तात्काळ उपचार आवश्यक असल्यास इतरत्र हलविता येणार आहे. या पूर्वी जिल्हा खनिज विकास निधीतून २० मोठ्या रुग्णवाहिका वितरीत करण्यात आलेल्या असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ रुग्णवाहिका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहे. या रुग्णवाहीचे माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय टळेल असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.