परप्रांतीया विरोधात स्थानिक ट्रक चालक मालकांत प्रचंड आक्रोश ; अनेक तास धरणे आंदोलन

घुग्घूस : आज गुरवारी 16 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथून जवळच असलेल्या नायगाव कोळसा खाणीच्या चेकपोस्ट जवळ येथील स्थानिक ट्रक चालक मालकांनी धरणे आंदोलन केले. स्थानिक पल्ला गाडीच्या ट्रक चालक मालकांना रोड सेलच्या डिओ मध्ये काम देण्यात येत नाही आहे. वेकोली वणी क्षेत्राच्या नायगाव, मुंगोली, पैनगंगा या कोळसा खाणीतील रोड सेलच्या डीओ मध्ये मोठे ट्रान्सपोर्टर टिप्पर गाडी लावून कोळसा उचलत आहे. यात आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील ट्रक लावून कोळश्याची उचल मोठे ट्रान्सपोर्टर करत आहे.

सप्रा, चड्डा, फुलको, भाटिया, गुप्ता अश्या मोठया ट्रान्सपोर्ट कंपण्यांना काम देण्यात आले आहे. या कंपण्या स्थानिक ट्रक चालक मालकांच्या गाड्या लावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
याचा निषेध करण्यासाठी मागील दोन दिवसापासून आपल्या गाड्या उभ्या ठेवून धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रवीश सिंग, नकोडा उपसरपंच मोहम्मद हनीफ, यंग चांदा ब्रिगेड चालक मालक संघटनेचे सय्यद अबरार,  सानू सिद्दीकी, राहुल यदुवंशी, कलीम खान, सुनील चिलका, अनिल ठाकूर, सोनू ढेमरे, दिलीप पांडे, इब्राहिम खान, वसीम शेख, सलीम शेख, परवेज शेख, ताजू शेख, इमरान शेख, आशिष गुंडेटी, फिरोझ शेख राजू शेख उपस्थित होते.