घुग्घूस नगरपरिषदेला पावसात संदिग्ध परिस्थितीत भीषण आग ?

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आगीत महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक

घुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पावसाची जोरदार एंट्री झाली असून रात्र – दिवस सारखा पाऊस शुरू असतांना नगरपरिषद इमारतीला आग लागण्याचा धक्कादायक प्रकार घुग्घुस येथे समोर आला आहे.
या आगीचे वास्तव सि.सी.टीव्ही कॅमेऱ्यात समोर येईलच.

गेल्या 27 वर्ष नंतर 31 डिसेंबर 2020 ला अस्तित्वात आलेली नगरपरिषद म्हणजेच घुग्घुस नगरपरिषद.
घुग्घुस वासीयांच्या अनेक आंदोलनानंतर घुग्घुस ग्रामपंचायतीचे अखेर नगरपरिषद मध्ये रूपांतर झाले.
काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला महिला मुख्याधिकारी म्हणून आर्शिया शेख यांची नियुक्ती सुद्धा झाली.

नगरपरिषदेचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले मात्र 8 सप्टेंबर ला पहाटे घुग्घुस नगरपरिषदेच्या इमारतीला भीषण आग लागली,

सदर आगीत अनेक महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली. इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला पण आगीच्या रौद्र रूपावर नियंत्रण मिळविण्यास वेळ गेला व महत्त्वाचे कागदपत्रे जळाले. एसीसी सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून आगीत अजून किती नुकसान झाले हे पोलीस तपासात पुढे येईलच.
सदर आग कशी लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे. सदर आगीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

घुग्घुस ग्रामपंचायत काळात येथे 09 कोटी 51 लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता त्याचा तपास हा थंड बस्त्यात असून तो येणाऱ्या काळात ही फाईल उघडल्या जाऊ शकते आज जळालेल्या कागदपत्रात ह्या कागदपत्राचा समावेश तर नाही ना ?

गेल्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक मध्ये विकास कामात अनेक भोंगळ कारभार झाल्याचे तक्रारी करण्यात आल्या त्या संदर्भातील दस्तऐवज तर नाही ना नागरिकांन मध्ये अश्या अनेक चर्चेना परिसरात पेव फुटले असून तपासणी अखेर सत्य उघडकीस येईल.