भ्रष्टाचाराशी संबंधीत पुरावे नष्ट करण्यासाठी आग लावण्याची शक्यता ?

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

” नगरपरिषदेत लागलेल्या आगजनी प्रकरणाचे पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात येणार असून यांची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल : आर्शिया जुही (सीईओ) नगरपरिषद

नगरपरिषदेला लागलेल्या आगीचे उच्चस्तरीय चौकशीची काँग्रेसची मागणी

घुग्घुस : आज दिनांक 08 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घुग्घुस नगरपरिषदेला आग लागली यामध्ये महत्वपूर्ण कागदपत्रे सह इलेक्ट्रिकल साहित्य जळाले आहे. गेल्या आठवड्यातच सदर दस्तावेज दुसऱ्या ठिकाणावरून या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने ही लागलेली आग ही पचनी पडत नाही. नगरपरिषद झाल्यानंतर अजून ही निवळणुक झाली नाही.
याठिकाणी ग्रामपंचायत काळातील कागदपत्रे आणि साहित्य होती यामध्ये तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच यांच्यावरील 09 कोटी 51 लाख रुपयांचा भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर सरपंच हे जिल्हापरिषद अध्यक्ष असतांना अशीच आग जिल्हापरिषद येथे देखील लागली होती तेव्हा ही ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार प्रकरण हा तापला होता. घटनेची सत्यता ही सिसिटीव्ही मध्ये येण्याची शक्यता नाही कारण मागील भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

एकंदरीत ही आग हेतुपूर्वक लावण्यात आल्याचीच जास्त शक्यता वाटत असल्याने सदर आग प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी काँग्रेस पक्षातर्फे नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर्शिया जुही यांना करण्यात आले.

शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.