वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : राजुरा, टेंभुरवाही, तुलाना, चिचबोडी येथे वाळूतस्करांनी धुमाकूळ घातला. काही दिवसांआधी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यावर तस्करांनी हल्ला केला. याची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी अमोल चोथले, समाधान बोबडे आणि राहुल साळवे यांच्यावर गुन्हा दाखल केला. तालुक्यातील लहानमोठ्या महसूली नाल्यातून वाळूची तस्करी करण्यात आली. त्यामुळे बहुतेक नाल्यांचे पात्र कोरडे पडले आहे.

यामुळे वाळूचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच वाळूचे दर गगनाला भिडल्याने आता राजुरा, टेंभुरवाही, तुलाना, चिचबोडी येथील वाळू तस्करांनी जंगलात धुडगूस घातला आहे.

सध्या राजुरा वनपरिक्षेत्रातील तुलाना, टेंबुरवाही वन बिटात वाळू चोरी सुरू आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी टेंभुरवाही क्षेत्रात  गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांवर तस्करांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जिवे मारण्याची धमकी दिली. त्याची तक्रार करण्यात आली.