घुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा : माजी सभापती – नितुताई चौधरी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : तालुक्यातील घुग्घुस येथे नव्याने नगर परिषदेची स्थापना झाली आहे. घुग्घुस हे लोकवस्तीने, व्यापार व औद्योगिक क्षेत्राने मोठे शहर असून वीज मंडळाच्या सर्व कामासाठी नागरिकांना चंद्रपूर येथील उप विभागीय कार्यालयात जावे लागते तसेच वीज मंडळाच्या अंतर्गत कामाच्या मंजुरी करिता कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात चंद्रपूर येथे वारंवार जावे लागते.

त्यामुळे घुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात सौ. नितुताई चौधरी माजी जिप सभापती महिला व बालकल्याण चंद्रपूर यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र व अध्यक्ष लोक लेखा समिती यांना निवेदनातून केली आहे.