चिमूर (चंद्रपूर) : महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक राज्यातील बोध्द भिक्खूची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संघरामगिरी येथे अनेक वर्षांपासून बोद्ध भिक्खू, उपासक बोद्ध धम्माचे अधिष्ठान करीत आहेत मात्र मागील दोन वर्षांपासून वनविभागाने ब्फ्फर झोन च्या नावाने रामदेगी,संघरामगिरी येथे बोद्ध भिख्खू, उपासक तसेच हिंदू धर्मीय बांधवना धार्मिक कार्यास बंदी घातली आहे त्यामुळे “संघरामगिरी रामदेगी” येथे प्रवेशासाठी शुक्रवारी बोद्ध भिक्खू,उपासक तसेच हिंदू धर्मीय नागरिक क्रांती मोर्चा काढून प्रशासनाच्या धोरणाचा निषेध करणार आहेत.
मागील 30 वर्षांपासून बौद्ध भिक्खू संघरामगिरी येथील जंगलातील पहाडावर दऱ्या -खोऱ्यात एकांतवासात बसून (अधिष्ठान) करीत असतात. नंतर जवळच्या परिसरात बौद्ध भिख्खू समाजामध्ये बोद्ध धम्माचा प्रसार करून तथागत गौतम बुद्धाच्या शिकवणीच्या आष्टगिक मार्ग व पंचशील तत्त्वाचे मार्गदर्शन बौद्ध अनुयायांना करीत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून संघारामगिरी येथे बौद्ध भिक्खू ,उपासक, हिंदू धर्मीय भाविकांना वनविभाग (बफर) झोन च्या नावावर बौद्ध विहारात व हिंदू धर्मीयांना मंदिरात जाऊं देण्यास सक्त मनाई करीत आहे. त्यामुळं बुद्धांनी दिलेली शिकवण तथगताच्या शांतीदूतांनी (अधिष्ठान) करण्यासाठी वन विभाग आडकाठी आणीत आहे त्यामुळे वनविभागा विरुद्ध बोध्द बांधव व हिंदू धर्मातील भविका मध्ये रोष निर्माण झाला आहे.
वनविभागाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी तथा जनतेला होणाऱ्या त्रासाची कल्पना यावी. या उद्देशाने चिमूर तालुक्यातील बौद्ध उपासक तथा हिंदू धर्मीय भाविक यांच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी ला गुजगव्हांन ते रामदेगी पायदळ मार्च काढण्यात येणार आहे. वनविभागाचे गेट हटविण्याकरिता चंद्रपूर जिल्यातील नागरिकांनी व बौद्ध अनुयायांनी या पायदळ मार्च मध्ये मोठया संख्येने सामील होऊन शासन दरबारी आवाज पोहचवावा. असे आव्हान बोध्द भिक्खू, उपासक,तसेच हिंदू धर्मीय भाविकांनी केले आहे.
यांचा असणार मोर्चात समावेश
प्रा. जोगेंद्र कवाडे, राजू झोडे ,आमदर किर्तीकुमार भांगडीया, सतीश पेंदाम, ऍड. सुलेखा कुंभारे, डाँ. सतीश वारजूरकर, डाँ. कमलाताई गवई, शेरखान पठाण. आदी मान्यवर यांचा सहभाग राहणार आहे.
बाबासाहेबाच्या आंदोलनाची आठवण
पेशव्यांच्या काळात अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले होते. मात्र स्वतंत्र भारतात तथा पुरोगामी म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्रात संघराम गिरी रामदेगी प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या आंदोलनाची आठवण होत आहे.