आमदाराला शिवीगाळ करणा-या हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सिओला अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• आमदाराविषयी बदनामी कारक पोस्ट केली होती सोशल मीडियावर व्हायरल

चंद्रपूर : चिमूर येथील हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोविड हेल्थ सेंटर रद्द मान्यता रद्द केल्याने हॉस्पिटलचे सीओ साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके यांनी आमदार बंटी भांगडीया यांचे विषयी कौटुंबिक तथा वैयक्तिक, अश्लील अपशब्द प्रयोग सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने आज सोमवारी त्यांना अटक करून जात मुचलक्यावर सोडण्यात आले आहे.

चिमूर येथील हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर करिता जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी अटी व शर्ती वर परवानगी दिली होती,परंतु दरम्यानच्या काळात हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या गैरव्यवस्थापनमुळे काही संघटनानी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हाधिकारी यांनी त्या तक्रारींची दखल घेत चौकशी करून डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर ची मान्यता रद्द केली. त्यामुळे हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सीओ संचालक असलेले साईनाथ उर्फ अश्वमेध बुटके यांनी आमदार बंटी भांगडीया यांनीच आपल्यावर कारवाईकरिता जिल्हा प्रशासनावर दबाव आणला असा आरोप करून सोशल मीडियावर आमदाराच्या कुटुंबीय व वैयक्तिक अपशब्द व अश्लील शब्दाचा वापर करीत पोस्ट व व्हायरल केली.

वारंवार समजावून सुद्धा साईनाथ बुटके ऐकत नसल्याने आमदार बंटी भांगडीया यांनी, आपल्या कार्यकर्त्यासह पोलीस स्टेशन चिमूर येथे धडक देऊन तक्रार केली असता चिमूर पोलिसांनी साईनाथ बुटके यांचे वर गुन्हा दाखल केला होता. आज त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करून जातमुचलक्यावर सोडण्यात आले.