ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी येथे बफर झोनमध्ये शनिवारी एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला आल्याने खळबळ उडाली आहे. जखमी वाघ किमान नऊ ते दहा वर्षांचा आहे. त्याला उपचाराकरिता गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलविण्यात आले आहे.

राज्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननात करिता योग्य असे ठिकाण आहे. देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता ताडोबातील पट्टेदार वाघांमध्ये आहे. संख्येने मोठ्या प्रमाणात असलेल्या वाघांचे हमखास दर्शन ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होत असते.

मात्र पट्टेदार वाघाच्या मृत्यूच्या घटनाही ताडोबात विविध कारणांमुळे होत असल्याने चिंताजनक बाब आहे. शनिवारी वनकर्मचारी गस्तीवर असताना आगरझरी बफरझोन मध्ये पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मागच्या दोन्ही पायांवर जखमा असल्याने त्याला नीट चालता येत नव्हते. दुस-या दिवशी इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध करण्यात आले. उपचारासाठी गोरेवाडा येथे रवाना करण्यात आले आहे. नऊ ते दहा वर्षाच्या पट्टेदार वाघाच्या मागील दोन्ही पायाला नेमका जखमा कशामुळे झाल्या हा चिंतेचा विषय आहे. अलीकडेच यवतमाळच्या जंगलात एका वाघिणीला गुहेत कोंढून मारल्याची घटना ताजीच आहे. ताडोबातील जखमी अवस्थेत आढळून आलेला वाघ हा नैसर्गिकरित्या की फाशात सापडून जखमी झाला हे ताडोबा प्रशासनाला शोधून अशा घटनांवर पायबंद घालावा लागणार आहे.