चंद्रपुरात म्यूकर मायकोसिस या संसर्गाचे मिळाले दहा रुग्ण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• दहा ही रुग्णांवर औषध उपचार सुरू
• त्या रुग्णांची प्रकृती ठीक : आरोग्य विभाग

चंद्रपूर : म्यूकर मायकोसिस हा कोरोना झालेल्या रुग्णांना नवा संसर्गाचा आजार होत असून चंद्रपुरात म्यूकर मायकोसिस या संसर्गाचे दहा(१०) रुग्ण चंद्रपुरात मिळाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे .
या दहा ही रुग्णांवर आरोग्य विभागाचा वतीने विशेष लक्ष दिले जात असून औषधोपचार सुरू आहे. कोरोना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या स्टेरॅडाईडमुळे रुग्णांना अतिशय गंभीर सामना करावा लागत आहे. म्युकर मायकोसिस बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णावर होत आहेत . राज्यभरात अशा अरुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. चंद्रपुरात म्युकर मायकोसीसही चे(१०) दहा रुग्ण मिळाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली.

या सर्व (१०) दहा ही रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. शहरातील एका सिटी स्कॅन सेंटर मध्ये स्कॅन करतांना या रुग्णांमध्ये हा आजार निदर्शनास आला आहे. मात्र येत्या काळात या रुग्णांची संख्या तथा मृत्यू वाढण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे या रोगावरील प्रतिबंधात्मक इंजेक्शन महागडे आहे. शस्त्रक्रियेचा खर्च देखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकर मायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.

म्युकर मायकोसिसचे लक्षणे

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे अशा प्रमाणे लक्षणे आढळून येतात.