एसीसी कंपनी विरोधात बिआरएसपीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु

एसीसी कंपनी व प्रशासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्षकेल्यास एसीसी कंपनीची ट्रक वाहतूक रोखण्याचा सुरेश पाईकराव यांचा पत्रपरिषदेतून इशारा

घुग्घुस : 5 जून पासून घुग्घुस येथील आठवडी बाजार रंगमंचावर भविष्यनिर्वाह निधी चोरी झालेल्या कामगारांच्या हक्कासाठी एसीसी कंपनीच्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन घुग्घुस बिआरएसपीच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.

आंदोलनास सहा दिवस लोटून सुद्धा एसीसी कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गुरुवारला सकाळी आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेण्यात आली जवळपास 3 कोटी रुपयाचा भविष्यनिर्वाह निधी थकीत असल्याचा आरोप करण्यात आला व लवकर आंदोलनाची दाखल एसीसी कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाने नाही घेतल्यास एसीसी सिमेंट कंपनीची ट्रक वाहतूक सिमेंट वाहतूक घुग्घुस मधून होऊ देणार नाही व कंपनी गेट समोर बेमुदत धरणा आंदोलन करण्यात येणार असा इशारा पत्रपरिषदेतून देण्यात आला.
एसीसी कंपनीच्या अंतर्गत तिरुपती कंस्ट्रक्शन नितीन शर्मा नावाचा कंत्राटदार मागील 2011 वर्षांपासून कंत्राट चालवीत आहे. या कंत्राटदाराने न्यू पॅकिंग हाऊस प्लांट येथील 190 व मेंटेनन्स डिपार्टमेंट येथील 13 कामगारांचा 2011 पासून भविष्यनिर्वाह निधी बरोबर भरला नाही. कामगारांना महिन्याच्या 15 ते 16 या पेक्षा कमी मासिक काम मिळते त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे कामगारांनी बिआरएसपीचे जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन 5 जून पासून घुग्घुस येथील आठवडी बाजार रंगमंचावर सुरु केले आहे.

पत्रपरिषदेत ईश्वर बेले इरफान पठाण, दीपक दीप, सदानंद ढोरके, शरद पाईकराव, अशोक आसमपेल्ली, सचिन माहुरे, एकनाथ पाहुणकर, दत्ता वाघमारे, अंबाला जयकर, समाधान गायकवाड, ए. जयंत, प्रवीण भोयर, शाम कंडे, एस. इसराईल, राजकुमार परवेश, अजय नागपुरे, नितीन नागपुरे उपस्थित होते.