आसरा कोव्हीड रुग्णालयातील ८ वॉर्डबॉय कामावरून कमी 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शहर महानगर पालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत गैरप्रकार केल्याप्रकरणी ८ वॉर्डबॉय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची कारवाई चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिलेल्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आली.

बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ९ जून रोजी गैरप्रकार केल्याचा व्हिडीओ वायरल झाला. ही बाब लक्षात येताच महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लगेच चौकशीच्या सूचना दिल्या.

वैद्यकीय चमू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनेची वस्तुस्थिती पडताळून बघितली. यात दोषी असलेल्या ८ वॉर्डबॉय कामावरून कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आसरा कोव्हीड रुग्णालयासह महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रशासकीय कामात गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिल्या आहेत.