बहिष्काराचा फर्मान करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : वर्षांनपासून जात पंचायतीने बहिष्कार टाकलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर समाजातील कुणीही मदतीला आले नाही. त्यानंतर सात बहिणींनी स्वत: खांदा देत वडिलांचा अंत्यसंस्कार आटोपला. यानंतर पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात बहिष्काराचा फर्मान करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपुरातील भिवापूर प्रभागातील भंगाराम वॉर्डात प्रकाश गणपत ओगले यांचे कुटुंब राहते. त्यांना सात मुली व दोन मुले आहेत. या कुटुंबावर २० वर्षांपूर्वी जातपंचायतीने बहिष्कार टाकला होता. अशात दोन दिवसांपूर्वी प्रकाश ओगले यांचा आजाराने मृत्यू झाला. शहरात गोंधळी समाजाची तीन कुटुंबे आहेत. परंतु, बहिष्कार असल्याने कुणीही खांदा द्यायला आले नाही.

अखेर, ओगले यांच्या सात बहिणींनी पुढाकार घेत स्वत: खांदा देऊन वडिलांचा अंत्यसंस्कार करीत जातपंचायतीला चांगलीच चपराक दिली होती.
याप्रकरणी ओगले कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बहिष्काराचा फर्मान काढणाèया सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यात जातपंचायतचे छत्तीसगडमधील दोन व विदर्भातील पाच जणांचा समावेश आहे.