देशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता, चांदा आयुध निर्माणींचा समावेश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोना मुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकार ला भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी येथे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व आरोग्य मंत्री यांना केली होती. त्याची दखल घेत आज आरोग्य मंत्रालयाने देशातील १६ रुग्णालयाला मान्यता दिली आहे. त्यात चांदा आयुध निर्माणी भद्रावती येथे अ‍ॅलोपॅथी रुग्णालयास मान्यता दिली आहे.

खासदार बाळू धानोरकर हे नेहमी सामान्य माणसाकरिता त्यांच्या आरोग्याचा प्रश्नासाठी कोरोना काळात स्वतःचा जीवाची पर्वा न करता काम होते. स्वतःचा पीपीई लावून रुग्णाची विचारणा ते करीत होते. भद्रावती मध्ये दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोनाची संख्या वाढली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः नागरिकांना आरोग्याची सुविधा होण्याकरिता प्रयत्न करीत स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमात्र खासदार बाळू धानोरकर आहेत. मतदारसंघात सामान्य नागरिकांसाठी धावून जाणारे व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. सामान्य जनतेसाठी आरोग्याची सुविधा मिळण्याकरिता त्यांची धडपड असते. भारत सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय द्वारा देशभरात १६ नवीन CGSH कल्याण केंद्रांना मान्यता देण्यात आली असून त्यात चंद्रपूर येथील चांदा आयुध निर्माणी भद्रावती च्या समावेश आहे, यामुळे भद्रावती येथील सामान्य नागरिकांना आरोग्याचा सुविधेकरिता सोईचे होणार आहे, या १६ नव्या अ‍ॅलोपॅथी CGHS कल्याण केंद्राकरिता ६४ पदांना मान्यता मिळाली असून मेडिकल ऑफिसर १६, फार्मसिस्ट १६, कलर्क १६, स्ट्रॉफ नर्स १६ या प्रमाणे पदे मंजूर झाली आहेत. सर्वानी खासदार बाळू धानोरकर यांचे आभार मानले आहे.