बैल शोधण्यासाठी गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• दुसरा नातेवाईक थोडक्यात बचावला

चंद्रपूर : हरविलेला बैल शोधण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत एकास जागीच ठार केले तर धावून आल्याने त्या शेतकऱ्याने पळ काढल्याने तो वाचला. ही घटना आज मंगळवारी (11 मे) ला सायंकाळी चार वाजताचे सुमारास चिरोली बिटाल घडली. किर्ती रामदेवराव कुळमेथे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो मुल तालुक्यातील जानाळा येथील रहिवासी होता. तर याच गावात दोन दिवसापूर्ची मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने गंभीर जखमी केले होते. दरम्यान आज त्या महिलेचाही मृत्यू झाला. वनिता वसंत गेडाम असे त्या महिलेचे नाव आहे.

मूल तालुक्यातील जानाळा येथील कीर्ती रामदेवराव कुडमेथे (24) या शेतकऱ्याचा बैल हरविल्याने तो नातेवाईकासोबत जानाळाला लागून असलेल्या चिरोली बिटात शोधण्यासाठी गेला होता. परंतु इतरत्र बैलाचा शोध बैल मिळाला नाही. त्यामुळे जंगलाता शोधता शोधता ते स्व:ताचे शेतात जानाळा शेतशिवारात पोहचले. दरम्यान या ठिकाणी धबा धरून बसलेल्या वाघाने कीर्ती रामदेवराव कुळमेथे शेतकऱ्यावर हल्ला चढविला. तर सोबत असलेल्या शेतकऱ्याने हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु वाघाने त्याचेवरही धावा घेतल्याने आपला जीव मुठीत घेवून तो पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. मात्र किती कुळमेथे याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना चिरोली बिटात, कक्ष क्रमांक 718 मध्ये घडली. त्यानंतर नातेवाईकाने सदर घटनेची माहिती दूरध्वनी वरून गावात दिली. लगेच काही नागरिकांनी घटनास्थळी येवून मृतदेहाची माहिती वनविभागाला माहिती दिली.

चिपल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी मधुमती तावाडे ,वनरक्षक आर.जे.गुरनुले, एस. डी. मरसकोल्हे,आर.व्ही.रोगे, वन्यजीवप्रेमी उमेशसिंह झिरे यांनी घटनास्थळी येवून मृतदेहाचा पंचनामा केला. सदर मृताच्या प्रश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. वाघाच्या हल्लयात तरूण शेतकऱ्याचा जीव गेल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

वाघाच्या हल्यात “त्या” जखमी महिलेचाही मृत्यू

दोन दिवसांपूर्वीच जानाळा येथीलच एका महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तितेचर रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान आज मंगळवारी त्या जखमी महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. वनिता वसंत गेडाम असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर महिला दोन दिवसापूर्वी मोहफुल वेचायला गेली होती. त्यावेळी वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ति गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान आज तिचाही मृत्यू झाला. काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचाही मोहफुल वेचायला गेला असता वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता. एकटया जानाळा येथीलच तिघांचा वाघाने बळी घेतला आहे. मात्र अजूनही वनविभाग या वाघाचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरला आहे. जानाळा गाव जगलालगत असल्याने वन्यप्राण्यांचा धोका नागरिकांकरिता निर्माण झाला आहे.